माझे दादा- Fathers Day!


माझे दादा

असं म्हणतात की, जन्मजात मुलीचा ओढा वडिलांकडे असतो आणि बऱ्याचदा वडीलच मुलीचे आदर्श आसतात. माझ्याही बाबतीत तेच घडलय. माझे वडील ’श्रीकांत आंबेकर’ यांना मी दादा म्हणते. आणि ते माझे आदर्श आहेत.
त्यांचा आपल्या आई-वडिलां विषयीचा आदर, त्यांचे वाचन,पत्रलेखन,सामोरी आलेल्या प्रसंगाला हसतमुखाने तोंड देण्याची त्यांची धीरोदत्त वृत्ती, एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे तन-मन-धनाने दुसऱ्यांना मदत करण्याचा स्वभाव,देवावरची श्रध्दा-विश्वास, समोरच्याची मन वाचण्याची कला,प्रेमपूर्वक कुटूंबाला एकत्र बांधून ठेवण्याच कसब सगळ काही मी लहानपणापासून अनुभवतच मोठी झाली आहे.
दादांचे विचार पहिल्यापासून किती प्रगल्भ ,प्रगत आहेत याचं एक उदाहरण सांगते. दादांसाठी त्यांचे वडील “वधू संशोधन” करत असता सर्वांना एरंडोलची “विजया” पसंद पडली आणि दोघांचे लग्न ठरले. पण वधूपित्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे मात्र लग्नाची तारीख लांबणीवर पडू लागली.चौकशी करता एक दिवस मध्यस्थ माणसाकडून वधूपित्याचा निरोप आला की,” आर्थिक परिस्थितीमुळे फक्त मुलगी,नारळ आणि दोन हजार रुपये देऊ शकतो, आपण लग्न करुन घ्यावे.” पण हा निरोप ऎकून दादांच्या वडिलांनी वधूपित्याला नकार कळवायला सांगताच, माझे दादा पटकन आपल्या वडिलांना म्हणाले,”अण्णा, मुलीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही यात मुलीचा काय दोष? तिच्या मनाचाही आपण विचार करायला हवा. मुलगी मला पसंद आहे तेव्हा मुलीचे वडील जे काही देतील ते स्वीकार करुन आपण स्वखर्चाने लग्न करुन घेऊया.” आपल्या मुलाचे उच्च विचार आणि दुसऱ्याच्या मनाचा विचार करणारा स्वभाव बघताच, अण्णांनी आपल्या मुलाच्या इच्छेला मान देऊन आनंदाने लग्नाला परवानगी दिली. ही घटना घडली १९६४ साली. त्यावेळी दोघां बापलेकांनी दाखवलेला विवेक वाखाणण्याजोगा तर आहेच पण अभिमानस्पदही आहे.
अर्थात एवढ्यावरच दादांचा चांगुलपणा संपला नाही तर त्यांनी काही वर्षांनी आपल्या वयस्कर आणि आजारी सासू-सासऱ्यांना आणि आजे सासूला आपल्या घरी बोलावून घेवून त्यांची शेवटपर्यत एखाद्या मुलाप्रमाणे मनापासून सेवा केली बोटावर मोजता येतील अशा मोजक्याच आदर्श जावयात माझे वडील आहेत याचे मला भूषण आहे. दादांनी आम्हां भावा-बहिणीत मुलगा-मुलगी असा कधी भेदभाव केला नाही. आमच्यातील मैत्रीपूर्ण नातेसंबंधामुळे माझ्या लग्नाच्यावेळी तर दादांनी माझी इच्छा जाणून घेऊन, घरच्यांचा विरोध पत्करुन अगदी मी ’हो’ म्हणेपर्यंत न कंटाळता माझ्यासाठी ’वर संशोधन’ केले.
दादांच्या वागण्या-बोलण्यामुळे त्यांनी आपली पत्नी,भाऊ-भावजय, बहिणी,मुल-बाळ, सुनां-जावई, सगेसोयरे,नातेवाईक,भाचरं,मित्र या सर्वाच्या ह्रदयात एक मानाचे स्थान मिळवले आहे. आपल्या मुलाइतकच प्रेम ते आपल्या डॉ. भावाच्या मुलांवरही करतात म्हणजेच आम्हां सात जणांचेही दादा खूप लाड करतात.
माझ्याही कळत नकळत मी दादांच्या वागण्या-बोलण्याचे,लिहिण्याचे अनुकरण करत आले आहे. त्यामुळे असेल वा कदाचित वारसा हक्कानुसार असेल,त्यांची वैचारिक बैठक ,साहित्यिक समृध्दी मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजते.
दादा,फादर्स डे च्या शुभेच्छा!

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s