इ वर्ले अक्षर

123

मी ज्योती कपिले,एक कवयित्री आणि Net savvy ही. त्यामुळे जेव्हा मला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे या वर्षी दिनांक २५ ते २७ डिसेंबर या काळात ठाणे येथे होत आहे.आणि ह्या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनात एक पूर्ण दिवस युवा साहित्य संमेलन असणार आहे. त्याचीच एक पूर्वतयारी म्हणून दिनांक १४ नोव्हेंबर रोजी इ वर्ले अक्षर ह्या नेटाक्षरीचे काव्य संमेलनाचे आमंत्रण इ-साहित्याचे सुनील सावंत यांचे कडून मिळाले त्यावेळी मी इंटरनेट वर लिहीणारे कवी लेखक आणि नेटवरील साहित्याचे वाचक या संमेलनात सामिल होत आहेत. या संमेलनात तुम्ही स्वतःच्या कविता वाचू शकता. किंवा आजवर ज्या लेखक कवींची ई पुस्तके तुम्ही वाचली, किंवा ब्लॉग आणि ई नियतकालिकांद्वारे ज्यांचे लिखाण आजवर वाचले त्यांना प्रत्यक्ष भेटू शकतो ह्या उत्सुकते पायी आणि कवी स्वभावानुसार कार्यक्रमाला जायचे ठरवले. शिवाय माझा पत्रकारितेचा क्लासही त्याच दिवशी विक्रोळीला सकाळी १० वाजता होता त्यामुळेही मला ठाण्याच्या कार्यक्रमाला जाणे सहज शक्य होते

नेमकं रविवारीच घरी पाहुणेही येणार होते त्यामुळे मी सकाळी लवकर उठून स्वैपाकाला लागले असतां नवऱ्याने मला,’ तू स्वैपाक करू नकोस तुला उशीर होईल. आम्ही बाहेर जातो जेवायला ‘असं बोलून मोठ्ठाच सपोर्ट दिला. मग काय पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी सकाळी ९ वाजता घराबाहेर पडले.आणि दुपारी २ वाजता क्लास आटोपून ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयात हजर झाले.

सगळीकडे तरुणाईचे राज्य होते. कवींची नोंदणी चालू होती. मी नोंदणी करून पोट पूजा करण्यासाठी जवळच असलेल्या “विसावा” मध्ये दोन घास खाल्ले आणि परत ३:३० ला हॉल वर आले. गर्दी आणि दर्दी जमले होते. पण नेहमीच्या प्रथेप्रमाणे ४ चा कार्यक्रम ५ वाजता सुरु झाला.

कार्यक्रमाचे संयोजक सुनील सामंत यांनी ‘लॉग-इन ‘केले, पाहुण्यांनी दीप प्रज्वलन करून काव्य संमेलनाचा भाग पहिला सुरु झाला त्यावेळी सुनील सामंत म्हणाले,’ आजची पिढी जिचा बराच वेळ इंटरनेट वर व्यतीत होतो पण तरीही ही पिढी कशी मराठीशी नाळ जुळवून आहे,कसा मराठीचा प्रसार,आणि प्रचार करते आहे कसं मराठी आपल्यापरीने जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे याचा लेखा-जोखा मांडून या तरुणाई च्या धडपडीचे फलित म्हणजे हे इ वर्ले अक्षर हे संमेलन होय हे नमूद केले.

उभ्या महाराष्ट्रातून नेट करी तेथे जमले होते.मकरंद सावंत आणि समीर सामंत यांनी लॉग-इन करून माईक चा ताबा घेतला तर सुमन परब,आल्हाद महाबळ,कौस्तुभ आपटे,भारती सरमळकर,प्राजक्त देशमुख ह्यांनी स्टेजचा ताबा घेतला सुमनने आपल्या सुरेल आवाजात पसायदानाला सुरुवात केली आणि,बा.भ.बोरकर,गदिमा,नारायण सुर्वे,कुसुमाग्रज,सुरेश भट,विंदा,८४ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या वेगळ्या धाटणीच्या कविता तर सदर केल्या पण काही स्वत:च्याही कविता त्यांनी सादर केल्या. वानगी दाखल काही ओळी सांगते

“माह्या मरणाने माझा मायबाप तो रडावा,चिता पेटू नये माझी असा पाऊस पडावा” एका बँकेत काम करणाऱ्या समीर सामंतच्या ह्या ओळी once more मिळवून गेल्या.टाळ्या,शिट्ट्या,दाद सहजरीत्या मिळत होती

बर मकरंद आणि समीरचे tunning इतके अफलातून होते कि बस्स!अतिशय सहज आणि ओघवत्या शैलीत त्यांनी सूत्र संचालन केलं पूर्ण टीम जबरदस्त होती. आणि त्यांना मार्गदर्शन मिळाले ते प्रो.विद्याधर वालावलकर यांचे.
अतिशय आखीव रेखीव कार्यक्रम! थोडेसे उन्नीस-बीस झालं असेलही पण कुणाच्याही लक्षात न येण्या सारखे .खर तर हा कार्यक्रम संपूच नाही असं वाटत असतांनाच कार्यक्रमाचा पहिला भाग संपला आणि मग मान्यवरांचा सत्कार सुरु झाले.
साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष पां..के.दातार यांनी सहर्ष घोषणा केली कि हा कार्यक्रम म्हणजे ८४ व्या साहित्य संमेलनाची नांदी होय.आणि कसं हे संमेलन आगळं – वेगळं होणार आहे याची चुणूक होय.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा.नरेद्र पाठक आणि निनाद प्रधान यांनी केले
मराठी सृष्टी डॉट कॉम चे निनाद प्रधान ज्यांनी साधारण १८-१९ वर्षांपूर्वी इंटरनेटवर भारतीय भाषा आणण्यात,वापरण्यात पुढाकार घेतला आणि ८४ व्या साहित्य संमेलनाची वेब साईट ही ज्यांनी बनवली आहे त्यांनी हा कार्यक्रम बघून मी ” trrmendous impress ” झालोय ह्या शब्दात आपला आनंद व्यक्त केला.
तर प्रा.नरेंद्र पाठक सरांनी ज्ञानेश्वर महाराजांचा,त्यांच्या दूरदृष्टीचा, ज्ञानेश्वरीचा दाखला देत सुमारे ७०० वर्षांपूर्वीच इंटरनेटचा ,ह्या संमेलनाचा पाया रोवला गेला असे सांगितले.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलेले कवी, प्रा.अशोक बागवे यांनी तरुणीचे कौतुक करून, कविता कशी सदर करावी याचे उदाहरण देऊन,पुढे संघर्षही करावा लागेल तेव्हा या यशाने भारावून न जाता सातत्याने प्रयत्न करा असा सल्ला दिला. तर सुनील सामंत यांनी तरुणाईने मोठ्या प्रमाणात साहित्य संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले.त्याच प्रमाणे पैशा शिवाय सोंग आणता येत नाही तेव्हा रसिकांनी शक्य तितकी आर्थिक मदतही करावी असं कळकळीचे आवाहन केलं
त्यानंतर कार्यक्रमाचा दुसरा भाग सुरु झाला कविता वाचन सुरु झालं,घड्याळ संध्याकाळचे ७:३० वाजल्याचे दर्शवित होते,त्यामुळे मी कविता वाचन न करण्याचा निर्णय घेतला कारण तसं तर कार्यक्रम ऐकून तर कान आणि मन दोन्हीही तृप्त झाले होते
ह्या अभिनव कार्यक्रमाची नोंद माझ्या मनाने तर घेतली होती पण ह्या माझ्या आनंदात तुम्हालाही सहभागी करून घ्यावे असे वाटल्याने हा लेख प्रपंच!!
कार्यक्रमात एका पुणेकर म्हटला कि ‘पुणे तिथे काय उणे’ असं असलं तरी मला आता म्हणावेसे वाटतेय कि “ठाणे तिथे काय उणे” तेव्हा हे ८४ वे साहित्य संमेलन “जरा हटके” होणार यात वादच नाही….

123

Advertisements

2 responses to “इ वर्ले अक्षर

  1. Dhanyawaad , tumhaalaa ha kaaryakram aavaDlaa…
    Tumchi kavita aamhaala aikta aali naahi yaachi khant aahe…
    chun aamcheech aahe… karyakram veLet suru karu shaklo naahi…
    pudhchya karyakramaat nakki sadar kara…

    Sameer

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s