८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे येथे होणाऱ्या परिसंवाद बद्दल माझी थोडक्यात मतं …

८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे येथे होणाऱ्या परिसंवाद बद्दल माझी थोडक्यात मतं …
महाविद्यालयातून साहित्यिक – सांस्कृतिक चळवळी हद्दपार झाल्या आहेत का?
महाविद्यालयात आजही सांस्कृतिक -साहित्यिक चळवली चालू आहेत,त्या वाढवायला पाहिजे, फक्त गरज आहे ती तरुणाईला त्यांच्याच भाषेत,शब्दात समजावून घेण्याची, सांगण्याची,त्यांची उर्जा योग्य त्या दिशेने वळवण्याची…

अनुवादित साहित्यामुळे मराठीच्या कक्षा रुंदावल्या आहेत का?

हे खरे आहे कि सध्या मोठ्या प्रमाणात अनुवादित पुस्तकांची निर्मिती होत आहे. या अनुवादित साहित्यामुळे मराठी भाषेचा नक्कीच फायदा होतोय,होणार कारण त्या निमित्याने काही व्यापक विचार,कल्पना,संस्कृती आपल्या भाषेत येतात. अस म्हणतात कि गाव सोडले की प्रगती होते
पण इथेही साधारण तसेच म्हणता येईल.अनुवाद्मुळे साहित्याच्या,माणुसकीच्या कक्षा रुंदावण्याचे
एक उदाहरण सांगते, माझ्या मुलीमुळे माझ्या वाचनात एक अप्रतिम कविता आली आणि अनुवाद करण्याचा काही एक विचार माझ्या डोक्यात नसतांनाही माझ्या हातून त्या कवितेचा अनुवाद झाला कारण त्या कवितेची असलेली, मला दिसलेली ताकद! ती अनुवादित कविता वाचल्यावर प्रत्येकाची प्रतिक्रिया अगदी हीच होती कि मलाही “नेत्रदान” करायचे आहे….तेव्हा सांगायचा हेतू हाच कि भाषा कुठलीही असो तिचा वाचनाऱ्यावर योग्य तो impact होतोय नां हे लक्षात घेण्याची. सोबत वानगीदाखल ती अनुवादित कविता देत आहे. ज्या कवितेचे मी पोस्टर बनवून विनामूल्य वितरण केले आहे … कवितेचे नाव आहे-“अमर डोळे” आपल्याला योग्य वाटल्यास आपण ही ह्या कवितेचे पोस्टर ह्या परिसंवादात स्टेजवर लावू शकतात, त्या कवितेची ताकद आजमावून पाहू शकतात…

सार्वजनिक वाचनालयांचे साहित्य प्रसारातील योगदान आहे का? वाचनालये लोकांपर्यंत पोहोचण्यात अपुरी पडत आहेत का?


राज्यभरात जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या गावात सार्वजनिक वाचनालये आहेतच. या वाचनालयांची संख्या किती? याबद्दल मात्र फारसे सांगता येणार नाही. मात्र वाचनालयांचे साहित्य प्रसारात मह्त्वाचे योगदान ठरले आहे,असेल.कर्तर गल्ली तिथे वाचनालय हवीत असे माझे मत आहे. इथेही परत मी माझेच उदाहरण देवू इच्छिते माझ्या घरी बरीच पुस्तक विकत घेतली जातात तरीही मी वाचनालयाची मेम्बर आहे. मी जे काही आज आहे,त्याचे श्रेय बरेचसे ह्या वाचनालयांना आहे मी बांद्राला राहते तेथे शासनाची ‘national लायब्ररी’ आहे. या वाचनालयात अगदी भरपूर पुस्तक आहेत. तुम्ही तुम्हाला हवी असलेल्या पुस्तकाची नावही सुचवू शकतात. या वाचनालयांकडून नेहेमीच साहित्य प्रसारासाठी बरेच उपक्रम आयोजित होतात. नुकतेच २ मे २०१० ला वार्षिक अधिवेशन झाले तेव्हा ह्या वाचनालयाकडून मला वक्ता म्हणून बोलावले गेले होते. सोबत खासदार भारतकुमार राऊत आणि लेखक अनंत सामंत होते .मला मिळालेला हा सन्मान माझ्या दृष्टीने माझ्या वाचन प्रेमाची वा वाचनालायावरील प्रेमाची पावतीच होती असे मला वाटते
वाचनालयात जर पुस्तकाच्या भरपूर प्रती, विषयातील वैविध्य,चांगल्या quality चे आणि चांगल्या स्थितीतील पुस्तक शिवाय नव्या युगानुसार dijital पुस्तकही सहज मिळाली तर लोक परत वाचनालयात गर्दी करतील,अर्थात वाचनालयाचे बाळकडू मात्र लहानपणापासून मिळायला हवे हे मात्र नक्की….

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s