फेसबुकमुळे

फेसबुकमुळे…
‘फेसबुक’ ही एक सोशल नेटवर्किंग साईट आणि नेटकर्‍यांमध्ये अतिशय लोकप्रिय. त्यापैकी काही फेसबुकवर यायला उत्सुक तर काही फेसबुकला नाक मूरडण्यास तत्पर,अर्थात ह्या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आणि ते तर चालणारच.
तर ह्या फेसबुकवर मला माझ्या भावाने त्याला आलेलं friend suggestion मला फॉरवर्ड केलं मी त्या व्यक्तीची प्रोफाईल बघितली ‘अनघा हिरे’ कवयित्री,अर्थात लिहिणारी त्यामुळे मी तिला लगेचच अ‍ॅड केल. मी तिच्या कविता,नोट्स,ब्लॉग,वाचू लागले. अनघा मला अतिशय उत्साही,भावनाशील,प्रेमवेडी,पण तेवढीच विचारी भासली. NBT च्या पुस्तकांचा तिने अनुवाद केलेला,तिचे e मासिक,तिचे e बुक्स, तिचे लहान मुलांविषयी असलेल फेसबुकवरील पेज, तिची फेसबुकवर झपाट्याने होणारी प्रगती मला अचंबित करून गेली,तिचे कौतुक वाटले,फेसबुकवर राहून कुठलाही Timepass न करता अगदी चांगल लिहिणारी ,समरसून जगणारी,दुसऱ्यांच्या लिखाणावरही प्रतिक्रिया देणारी….(हो हे महत्वाचे आहे) ,तसेच मी करते आहे ते योग्य आहे का? काही सुधारणा सांग न ताई, अशी नम्र विचारणा करणारी. अनघाच्या लाघवी स्वभावामुळे, लिखाणामुळे आमचा सूर जुळला. लवकरच आम्ही फोन नंबर शेअर केले आणि प्रत्यक्ष बोलायलाही लागलो. मी नाशिकला आल्यावर आमचे भेटायचे ठरले. आणि एक दिवस(२ जुलै)अचानक काही महत्वाच्या कामासाठी मी रात्री नासिकला गेले.आता नासिकला गेल्यावर मला अनघाची आठवण येणार हे तर ओघाने आलचं. मी तिला दुसर्‍या दिवशी सकाळी ११ वाजता फोन केला.तिला प्रत्यक्ष भेटण्याची उत्सुकता होती त्यामुळे ती काही कामात वगरै असेल असा कुठलाही विचार मी केला नाही,आणि चक्क तिला ‘मला भेटायला ये’ असं फर्मान सोडलं.’मी प्रयत्न करते’ असं ती म्हणाली. मी तिची दोन वाजेपर्यत वाट बघून परत तिला फोन केला,”अनघा, मी पाच वाजेपर्यंतच आईकडे आहे नंतर सासरी जाणार आहे.” ती येते म्हणाली,पण तिला मात्र मला भेटायला यायला जमत नव्हतं…. पाच वाजून गेले तरी ती आली नाही त्यामुळे मी अनघा भेटेल ही आशा सोडली. पण वाटलं,ही का बर आली नसावी? का फेसबुकची मैत्री हिला खरी नाही वाटली?(तरी बरं, मी एक स्त्रीच होते.) मी का नाही तिला विचारले नाही की तुला यायला जमत नसेल तर मी भेटायला येवू का? तिनेही मला भेटायला बोलावलं नाही,कां? असे एक ना दोन हज्जार प्रश्न माझ्या मनात डोकावले. शेवटी ही ‘आभासी मैत्री’ असं मीच माझ्या मनास समजावून सासरी जाण्यासाठी निघाले.
सासरी गेल्यावर सासूबाईंशी गप्पा मारत असता बरोबर सात वाजता अनघाचा फोन आला. माझ्या मनात जराशी नाराजी होतीच. आता तिने नक्की मला यायला जमल नाही,sorry म्हण्यासाठी फोन केला असावा असं मला वाटलं. मी फोन उचलला तर अनघा म्हणाली,” अग ताई, मुलीच्या शाळेमुळे,मिटींग्जमुळे मला भेटायला यायला जमलं नाही…आता येवू का?” मी म्ह्टलं,” नेकी और पुछ पुछ?” मी पटकन तिला सासरचा पत्ता सांगितला आणि हसरी अनघा तिच्या अतुलसह दहा-पंधरा मिनिटात मला भेटायला हजर झाली.
अर्धा पाऊण तास आमच्या छान गप्पा झाल्या. माझ्याशीच नाही तर घरात सगळ्यांशीच अनघा बोलली,ती किती साधी,निगर्वी,मनमोकळी आहे याचा मला पुन्हा नव्हे प्रत्यक्ष प्रत्यय आला….तिच्याशी खूप गप्पा मारल्या आणि त्यातून मला ती उलगडत गेली.
आई-बाबांकडून मिळालेला “वाचन” संस्कार,वेळोवेळी भेट म्हणून मिळालेली पुस्तकं यामुळे अनघाला वाचनाचं वेड लागलं
आणि निबंध लेखनात तिचं मन रमायला लागलं. शाळेचा पूर्ण तास तिला निबंध लेखनासाठी अपुरा पडायला लागला.हळूहळू कविता,डायरी..मनातलं कागदावर उमटायला लागलं. लग्न झाले,अतुलशी बंध जुळले,सूर जुळले मन पिसारा फुलून आला पण खर्‍या अर्थाने तिच्या लिखाणाला बहर आला तो अदितीचा जन्म झाल्यावर आणि मग अदितीसी बोलताना,खेळताना बाल कविता,कथा,अनुवाद असं काही बाही ती लिहू लागली. तिचं लिखाण जणु काही तिला जगण्याची उर्जा पुरवत होतं.
तिने लहान मुलांच्या काही जपानी/इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद केला होता. तो प्रकाशित करण्यासाठीही तिला बर्‍याच अडचणीतून जावं लागलं.पण तिने हार मानली नाही.
खर तर तुमचं लिखाण,तुमची बोली नेहमी शुध्द असावी असा आग्रह धरला जातो,ते एका अर्थी बरोबरही आहे पण बरेचदा तुमच्या बोलीवर तुमच्या परिसराचा परिणाम होतो आणि त्याचे पडसाद तुमच्या लिखाणात उमटतात. आता अनघा लिहू लागली होती. अनेक वृत्तपत्रात तिच लिखाण प्रसिध्द होवू लागलं होतं. अनेक लेखकांशी तिच्या ओळखी झाल्य़ा.त्यातून तिला एका वेबसाईटवर आपलं लिखाण टाकता येतं हे समजलं.त्या साईटवर तिने आपलं लिखाण अपलोड केलं आणि तिथल्या एका व्यक्तीने अनघाच्या बोली भाषेतील लिखाणाबद्दल तिला बरचं काही सुनावलं,मला वाटतं त्या व्यक्तीला “मानसशास्त्र” हा प्रकारच माहिती नसावा.साहित्याची समज नसावी. माझ्या मते प्रथम लिहणं,व्यक्त होणं महत्वाचं, ते लिखाण दर्जेदार असणं महत्वाचं,आणि बोली भाषेतील लिखाण हे लिखाण लिखाण नाही कां? पण हे ऎकणार कोण?असो, त्या व्यक्तीच्या वाग्बाणाने अनघा दुखावली,तिने त्या गृहस्थांना विचारलं खानदेशच्या कवयित्री बहिणाबाई यांचे लिखाण तर बोली भाषेतच आहे, त्यांनी सरस्वतीला सरसोती लिहिले आहे मग आपण ते आहे तसं स्वीकारलय नां? पण त्या चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही तेव्हा मात्र तिने ठरवलं की आपण स्वत: एक असं व्यासपीठ तयार करु या,ज्या व्यासपीठावर वेगवेगळ्या बोली भाषेत लिहिलं तरी त्याचे स्वागत होईल.अर्थात लिखाण दर्जेदार हवं. आणि मग जन्म झाला “माझ्या मना” या फेसबुकवरील पेजचा,इ मॅगेझिनचा. दर महिन्याच्या १० तारखेला अनघा ते मॅगेझिन प्रकाशित करते. “माझ्या मना”मुळे नवोदितांना एक हक्काच व्यासपीठ मिळालं आहे. हे सगळं तिच्या कडून ऎकत असतांना तिचं असं एक वेगळं पण र्निभिड रुप सुध्दा माझ्या समोर आलं. असं म्हणतात की जे होतं ते चांगल्यासाठीच! खरचं अनघाने तिचा कडू अनुभवाला एक सकारात्मक वळणं देवून त्यातून सर्वसमावेशक नवनिर्माण केलं हे महत्वाचं. तिने आता इ-पुस्तक करण्याचे कामही चालू केलयं,त्या कामासाठी तिला तिची मुलगी अदितीची खूप मदत होतेय,काही फेसबुकवरचे फ्रेंडही त्या कामात तिला मदत करीत आहेत आणि अतुलचा सपोर्ट तर नेहेमी आहेच…
अनघाचं तिच्या मुलींबद्दलचं कौतुक, कुटुंबाविषयीची ओढ,अतुलवरचे प्रेम, मैत्री विषयक आदर,तिचे फेसबुक वरच्या मासिकाचे उत्तम व्यवस्थापन, सगळ्यांना सांभाळून स्वत: पुढे जाणारी ही अनघा माझी मैत्रीण आहे याचा मला खूप अभिमान वाटला.अर्थात हे सगळे ऋणानुबंध, ही मैत्री फेसबुकमुळे जुळली(हो,फेसबुकची किर्ती तर तुम्हाला सांगायलाच नको) हे खरतर अजूनही मला खर वाटत नाहीये …
—————————————-

Advertisements

11 responses to “फेसबुकमुळे

 1. ताई हे काय ? अग मी पण सगळ्यां सारखीच सामान्य आहे …हे काय मला अगदी लाजल्या सारखे झालेय…पण छान वाटलं माझ्याविषयी कोणी असा विचार करतंय….मला पण त्या आपल्या भेटीचा फार आनंद झाला ..आपली मैत्री अशीच कायम राहीलच …
  अनघा

 2. me ya bheticha sakshidaar 😀
  Kaki khupchan lihilayes !!!

 3. ज्योती जी,
  अगदी छानच लिहिले, बऱ्याच वेळा या आभासी जगतामध्ये ,झालेल्या ओळखींवर विश्वास ठेवला जात नाही , कारण याला हे आपले ‘फेसबुक वासी’ आपल्या ओळखी लपवून असतात, स्वत:चे छाया चित्र न लावता ,काहीतरी वेगळा प्रकार करीत असतात ..आपले वैयक्तिक सौंदर्य हे आभासी आहे, मनाची सुंदरता महत्वाची हे सांगण्यासाठी कुणाची गरज नाही !
  आणि आपण जर पारदर्शक राहिलो तर ,जग खरच सुंदर आहे याची प्रचीती यायला वेळ लागणार नाही ..माझा स्वत:चा तरी हा अनुभव आहे ..

  अनघा ,हि तशीच पारदर्शक आहे म्हणून तुम्ही तिला भेट शकलात , शेवटी माणुसकी हि महत्वाची , कोण मोठे, कोण छोटे हा भाग यात येत नाही..प्रत्येक जण हा आयुष्यात कुणासाठी तरी मोठाच असतो , मग तो झोपडीतला असो व महालातला…………

 4. Anagha ”HIRE”! Sirf naam hi kafi hai..kai,un kiti lihinar hyanchyavishayee..tumhi bhagyavan aahat,tumachi bhet zali..mazi,tyanchi bhet kadhi hoil..dev jane..tyanchya kavitevishayee lihitana shabd fike padtat…HEERA HAI..SADA K LIYE..

 5. Great………………just great!!!!!!
  Facebook is great channel to connect with people. It is up to us how we take it and how we interact onscreen and offscreen also.
  Anagha u r really great…………………maitriche nate he fulasarkhe aste te jase fulwawe tase fulte…………………..Wish u both a very happy and healthy friendship.

 6. ज्योती, तू जे अनघाचे वर्णन केलेस त्यात कुठेही अतिशयोक्ती नाही. अनघाबद्दल लिहिताना तिच्यासोबत तुझ्याही उत्तुंग व्यक्तिमत्वाचे दर्शन झाले. दुसर्यांची सार्वजनिक स्तुती करणे, प्रत्येकाला जमतेच असे नाही. पण तू ते सहज शक्य केलेस ते ही वृत्तपत्रातून! ……. तुला तिची मैत्री असल्याचा अभिमान आहे आणि मला तुम्ही दोघीही माझ्या मैत्रिणी असल्याचा..!……..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s