कशासाठी? पोटासाठी!

मुंबईच्या बॉम्बस्फोटाची बातमी ऐकून धडाधड गावाकडचे फोन येतात,तुम्ही सगळे ठीक आहात ना? मुलं,नवरा,घरीच आहेत ना? मुंबईला फारच बॉम्बस्फोट होतात.आम्हांला तुमची काळजी वाटते.” तेव्हा मी फोनवर म्हणते खर,”हो, सगळे सुखरूप आहेत ,मुंबई आपली आर्थिक राजधानीना…त्यामुळे मुंबईलाच टार्गेट केल जातय…तुम्ही काळजी करू नका.” पण खरतर मी फोनवर तुम्ही काहीही काळजी करू नका असं म्हटले असले तरीही मला काळजी वाटतेच. मुंबईत कधी आणि कुठे काय होईल याचा नेम नाही… मुंबईवर संकट येण्याचे कारण काहीही असो पण वैऱ्यावर येऊ नये असे प्रसंग मुंबईकरांवर सतत येत राहतो..आपणही मुंबईकर आहोत….काळजी तर वाटणारच ना? तो सर्व शक्तिमान परमेश्वर मुंबईचे,देशाचे रक्षण करो…….संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देवो…बस हीच प्रार्थना करू शकतो……
ही माझी २००० सालची कविता! आजही तीच परिस्थिती आहे…..
आज आपल्या मुंबईत
मरण झाल सोप्पं आणि जगन झालं अवघड
रत्यावर होतात खून,कुणी acid फेकून मारी
गेलात सागरकिनाऱ्यावर रात्री
तर परतायची नाही खात्री
सावळा गोंधळ रेल्वेचा आणि धसका बॉम्बस्फोटचा
घर सुद्धा राहिले नाही फारसे सुरक्षित
कुणीही यावे अन भोसकून जावे
चोरीमारी,बलात्कार
वयाचा सुद्धा मारेकरी करीत नाही विचार
जेवढे कायदे निघालेत तेवढ्या त्यांच्या पळवाटा
कधी तर रक्षकच घेतात भक्षकाकडून अर्धा वाटा!
सोसतोय बिचारा सामान्य माणूस
स्वत:च स्वत:चे रक्षण करीत
जमेल तेवढा मदतीचा हात घेत
जमेल तेवढा मदतीचा हात देत
कशासाठी? पोटासाठी!
जगण्यासाठी! जागविण्यासाठी!!

Advertisements

2 responses to “कशासाठी? पोटासाठी!

  1. Khupchan !!!
    aaj kaal baher gelela partel ka hyachi shashvati naste !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s