एक आठवण, एक साठवण १५ ऑगस्टची…

एक आठवण, एक साठवण १५ ऑगस्टची

आपण साधं,सरळ आयुष्य जगत असताना अचानक काही वेगळा,अगदी खास प्रसंग आपल्या अनुभवास येतो आणि त्याने आपले जगण्याचे मायनेच बदलून जातात. आता १५ ऑगस्ट म्हटल की मला आठवत ते मागच्या वर्षीचे एक खास झेंडा वंदन! देवाकडून लिहिण्याची देणगी मिळाली आणि जगणं समृध्द झालं. त्याचाच एक अविष्कार म्हणजे,२०१०चे १५ ऑगस्ट होय. बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड हे सुभाष नगर एज्युकेशन सोसायटी चेंबूरचे सेक्रेटरी. त्यांनी मला मुक्तानंद हायस्कूल मध्ये झेंडा वंदन करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहाल काय असे विचारल. ते ऐकताच मी हरखून गेले. आज पर्यंत शाळा,कॉलेज मध्ये असतांना सकाळी सात वाजता आपण झेंडा वंदनाला विद्यार्थी म्हणून उपस्थित राहिलोय पण आज आपण स्वत: झेंडा वंदन करायच? एक प्रमुख अतिथी म्हणून? एक आनंदाची लहर तनामनात पसरून अंगावर आनंदाचाच शहारा उमटला. हे राष्ट्र स्वतंत्र करण्यासाठी कित्येक देश भक्तांनी आपले प्राण पणाला लावलेत आणि हा सुदिन सर्व भारतीयांना मिळवून दिला आणि त्या दिवशी राष्ट्र ध्वज,तिरंगा उभारण्याची सुसंधी,मान सन्मान आपल्याला आपल्या लिखाणामुळे मिळतोय याचा मला खूपच आनंद झाला. आता ही एवढी महत्वाची संधी कोण नाकारणार बरं? अर्थात ती संधी मी स्वीकारली, मी ज्यांना ज्यांना याबद्दल सांगितले त्या त्या व्यक्तींनाही खूप आनंद झाला. १५ ऑगस्ट २०१० ला आपला तिरंगा.राष्ट्र ध्वज मी माझ्या हस्ते उंचावला. संपूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांनी, बॅन्ड पथकाने झेंड्याला मानवंदना दिली. त्यावेळी NCC आणि RSP ची मुलं ही उपस्थित होते. शाळेचे विविध पदाधिकारीही आवर्जून हजर होते.त्यामुळे एक वेगळाच माहौल, वातावरण तिकडे तयार झाले होते. सत्कार,पुरस्कार मिळण्यापेक्षाही जास्त आनंद मला अनुभवयास मिळत होता.अगदी कुणी VIP झाल्यासारखे वाटत होते. त्यावेळी माझ्या हस्ते शाळेच्या हस्त लिखिताचे प्रकाशन केले गेले, माझ्या हातून दहावीच्या पास झालेल्या मुलांना पुरस्कार दिले गेले. मी मुलांना अभ्यासात सातत्य कसे ठेवलं पाहिजे यासंबंधी मार्गदर्शन केले. अब्राहम लिंकनने कसं आपल्या आईचे ऎकून अभ्यास केला ती गोष्ट सांगितली.एक निराळाच माहौल त्यादिवशी मी अनुभवला. १५ ऑगस्टच्या त्या सन्मानाने,वातावरणाने मी अगदी भरून पावले.एक अविस्मरणीय दिवस मला माझ्या लिखाणामुळे मिळाला. आज ही गोष्ट इतिहास आहे. पण तो माझ्यासाठी सुवर्णाक्षरांनी लिहिलेला आहे! मी लिहितेय ,त्यामुळे बरेच मान सन्मान मला मिळतात पण हा अभिमानास्पद सन्मान, मुक्तानंद हायस्कूल ,प्राथमिक शाळेच्या मुख्याधापिका सौ.वैशाली सावंत आणि बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्यामुळे मला मिळाला.आणि म्हणूनच जन्मोजन्मी त्यांच्या ऋणात राहणचं मला आवडेल.
———————————————————————————————————————

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s