वटवृक्षाच्या सावलीत…

साहित्याची वाटचाल सुरु असतांना ‘टोनिक’ नावाच्या मैलाच्या दगडामुळे जीवनात एक नवी प्रगल्भता,जबाबदारीची जाणीव आली.खूप काही शिकायला मिळाले, अजूनही खूप काही शिकत आहेच .त्यापैकी एक, मला समृध्द करणारा अनुभव म्हणजे कवी श्रेष्ठ मंगेश पाडगावकर यांच्या बरोबरचा नाशिक दौरा होय.
टोनिक चे व्यवसाय प्रमुख संजय थोरात यांचे परम स्नेही नासिकचे श्रीज्योती स्टोर्स चे सर्वेसर्वा श्रीज्योतीराव खैरनार उर्फ नाना यांच्या ग्रंथ महोत्सवासाठी त्यांना उद्घाटक म्हणून कवी श्रेष्ठ मंगेश पाडगावकरच पाहिजे होते,तो योगायोग माझ्यामुळे जुळून आला त्यामुळे तुम्हीच पाडगावकर सरांना नासिकला घेवून यावे हा नानांचा आग्रह मला मोडता आला नाही कारण दोन दिवस दस्तुरखुद्द कवी श्रेष्ठ पाडगावकर यांना एवढे जवळून ऐकायला ,भेटायला मिळणार होते आणि कुठलाही कवी अशी संधी सोडणार नाही अर्थात मीही सोडली नाही.आणि मी पालखीची भोई झाले.
दुपारी ३ वाजता मुंबई सोडले.हसत खेळत प्रवासाला सुरुवात झाली सरांच्या कोट्या,मिश्कील बोलणे ,हजरजबाबीपणा याचे प्रत्यंतर आले .त्यापैकी काही वानगी दाखल सांगते. बोलता बोलता सर मला म्हणाले बर झालं तुम्ही मागे बसल्या…म्हटलं का? तर म्हणतात कसे,’तुम्ही पुढे बसल्या असत्या तर माझे डोळे दिपले असते.तुमचं नाव ‘ज्योती’ नाही का?’
त्याचप्रमाणे टोनिक चे मानकर काका यांना त्यांनी पदवी दिली ”खाली मानकर” कारण काका सतत कुणाचे न कुणाचे स्केच करण्यात मग्न! संपूर्ण प्रवासात असेच हास्याचे कारंजे उडालेले होते.
खरेतर पाडगावकर सरांना ‘नागीण’ झाली होती ती बरी झाली पण त्याच्या वेदना अजून शमल्या नाहीत.पेनकिलर जास्त घेता येत नाहीत तेव्हा सर म्हणाले माझ्या नातवाने जो US ला मेडिसिन मध्ये MS करीत आहे त्याने एक औषध माझ्यासाठी शोधून काढलय,म्हटलं कुठलं? तर म्हणतात कसे ”सोसा” जेवढे जमेल तेवढे सोसा!
अशावेळी खूप वाईट वाटतं की आपण त्यांच्या वेदना शमाव्या म्हणून काहीच करू शकत नाही.हो फक्त प्रार्थना करू शकतो…देव त्यांना त्या वेदना सहन करण्याची शक्ती देवो! त्या वेदना विसरता याव्यात म्हणून ते आजही कार्यक्रम स्वीकारतात,त्यांना बर्याचदा काही गोष्टी आठवत नाहीत पण मात्र भेट म्हणून मिळालेलं पुस्तक चाळतानाही ते ही ओळ नंतर पाहिजे होती तर ही ओळ आधी पाहिजे होती असे पटकन बोलून जातात.
पाडगावकर सरांनी कधीच कुणाचा हेवा केला नाही की वादग्रस्त विधान केली नाहीत ते सदैव आपल्या लिखाणात मग्न असतात.हे त्यांचे एक मोठ्ठं वैशिष्ठ!
पाडगावकर सरांची लोकप्रियता अशीच अफाट आहे,आम्ही जिकडे गेलो तिकडे लोकांनी त्यांना ओळखले, त्यांच्या सह्या घेतल्या त्यांच्या बरोबर फोटो काढले त्यांची आवडती गाणी खुद्द पाडगावकर सरांनाच गुणगुणन दाखवली. ”आज आम्हांला आमचा देव भेटला” अश्या स्वरुपात लोक, त्यांचे भक्त व्यक्त होत होते. ते पाहून मनाला अतिशय समाधान वाटत होतं कारण त्या क्षणाचे साक्षीदार मला होता आल … ह्या वटवृक्षाच्या सावलीत मला काही क्षण घालवता आले आणि हीच माझी समृद्धी.हेच माझ समाधान!

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s