फेसबुकच्या ‘माझ्या मना ई प्रकाशना’चा प्रथम वर्धापन दिन साजरा

आबाल वृद्धांना वेड लावणाऱ्या फेसबुकवर अनेक ग्रुप्स उदयास येतात आणि तेवढ्याच पटकन अस्तासही जातात. पण ‘माझ्या मना ई प्रकाशन ‘’ हा नासिक येथील अनघा हिरे यांनी खास नवोदित लेखकांसाठी फेसबुकवर निर्माण केलेल्या ग्रुपला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्याने मुंबई-आग्रा महामार्गावरील दादासाहेब फाळके स्मारकात एका स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
दिवसभराच्या या कार्यक्रमात गाजलेल्या हिंदी-मराठी चित्रपटांतील गाणी तसेच काव्यवाचन, गझल आणि नाट्य-अभिनय सादर करत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात फेसबुकवरील ‘माझ्या मना’ या ई प्रकाशन समूहाचा वर्धापनदिन मोठय़ा जल्लोषात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अरुण देशपांडे, विजय तरवडे उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गझलकार बदिउज्जमा बिराजदार होते. याप्रसंगी आयोजन समितीप्रमुख अनघा हिरे, शीतल पोटे, अजय आहुजा, संतोष वाटपाडे, श्रीराम वाघमारे, मोहन कुर्‍हाडे यांनी मनोगत व्यक्त केले. तर ज्योती कपिले यांनी लवकरच फेसबुकच्या ‘माझ्या मना ई प्रकाशन’ आता स्वत:ची वेबसाईट काढून नव्या-जुन्या लेखकांना एक व्यासपीठ मिळवून देणार आहे. असे आपल्या प्रास्ताविकात सांगितले. उत्तरोत्तर रंगणाऱ्या ह्या कार्यक्रमाचे सुत्र संचालन वर्षा चौघुले यांनी केले. दरम्यान, ज्येष्ठ सदस्य म्हणून सक्रिय असलेल्या प्रदीप केळकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गझलकार बिराजदार यांनी सादर केलेल्या ‘सकाळी सकाळी’, ‘ती अशी का प्रेम करते तात्पुरते’, ‘लिहिण्यास तू आम्हा देत असे चेतावणी’, ‘आयुष्यबदिउज्जमा बिराजदार- माझ्या गझला, अरुण देशपांडे- झुळूक, मोहन कारखानीस- अग्निदिव्य, वर्षा चौघुले- तुझ्याच साठी, संतोष वाटपाडे- हरवलेला, मोहन कुर्‍हाडे-फक्त तुझ्याचसाठी, नंदू सावंत -सहजच, दीपक खांडे- शब्ददीप अश्या कवींच्या कथा-काव्यसंग्रहांच्या एकत्रित सीडीचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमास विजया शिंदे, संदेश चोपडा, संजय कुलकर्णी, तारा ठाकरे, पुंडलिक गाडेकर असे अनेक सभासद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ह्या मेळाव्यास उपस्थित राहिले आणि हुरहुरत्या मनाने,परत लवकरच भेटूया असे म्हणत नवीन ऋणानुबंध जोडून आपापल्या घरी परतले. अर्थात पुन्हा भेटण्यासाठी …..

Advertisements

One response to “फेसबुकच्या ‘माझ्या मना ई प्रकाशना’चा प्रथम वर्धापन दिन साजरा

  1. प्रकाशनविश्व : २०१३-२०१४’ हे अप्रतिम पुस्तक दि. १४ नोव्हेंबर, २०१२
    रोजी (दिवाळी पाडवा) प्रकाशित झाले आहे. मराठी साहित्यिक, प्रकाशक, चित्रकार, मुद्रितशोधक, अनुवादक, पुस्तकविक्रेते, ग्रंथालये यांची नावे, पत्ते, फोन क्रमांक, तसेच पुस्तकांना पुरस्कार देणाऱ्या संस्थांची माहिती या पुस्तकात
    आहे. पाने : ७६४ मूल्य : ५०० रु. मर्यादित प्रती. संपर्क : प्रकाशनविश्व,
    सी-१२, हर्षदा गार्डन, महागणेश कॉलनी, पौड रोड, पुणे ४११०३८ फोन : ९४२२०८८५७८ इमेल : prakashanvishwa@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s