गुड फ्रायडे

Image

गुड-फ्रायडे हा ख्रिस्ती धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस असून हा दिवस पापावर पुण्याचा विजय म्हणूनही ओळखला जातो. यहुदी लोक फेब्रुवारी महिन्यात चंद्र बघून गुड फ्रायडे हा दिवस निश्चित करतात. आणि गुड फ्रायडेच्या चाळीस दिवस आधी येणाऱ्या बुधवारपासून या उपासाला सुरवात होते. या बुधवारला राखेचा बुधवार असेही ओळखलं जातं. ही प्रथा ख्रिस्ती लोकांनी सुरु केली. प्रभू येशूने मानव सेवा सुरु करण्याच्या आधी ४० दिवस व्रत,उपवास सुरु केले होते आणि तेव्हापासूनच ही परंपरा सुरु झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण जगात गुड फ्रायडेच्या तयारीसाठी, इसाई लोकं मनापासून चाळीस दिवसाचे व्रत करतात. गुड फ्रायडेच्या पहिल्या गुरुवारी पवित्र भोज विधी असतो कारण त्या दिवशी प्रभू येशूने आपल्या शिष्यांसमवेत भोजन घेतले होते. हा  पूर्ण आठवडा अतिशय श्रद्धेने दु:ख भोग सप्ताह पाळतात. मद्यमांससेवनही  ह्या दिवशी वर्ज्य मानलं जातं.  या दिवशी कोणतेही आनंदायक कार्यक्रम साजरे करण्यात येत नाहीत.मात्र  येशूच्या स्मरणार्थ घराघरातून प्रार्थना,सभा, प्रवचन, बाइबलचे पठण केलं जातं.लोकं आपल्या पापासून शुद्धिकरण, पश्चाताप करू इच्छितात. आपल्या हातून घडलेल्या गुन्हाची माफी मागतात. गुड फ्राइडेच्या दिवशी घंटानाद करत नाहीत. कारण इसाई लोकांची अशी समजूत आहे की या दिवशी येशू ख्रिस्ताकडे आपल्या धावपळीच्या जीवनात सुख-शांती येण्यासाठी,समस्त मानव कल्याणासाठी फक्त मनापासून प्रार्थनाच करावी.       

येशू ख्रिस्ताला खूप अनुयायी निर्माण झाले होते आणि ह्याच कारणांनी त्यांना शत्रूही निर्माण झाले…. त्याचा परिणाम म्हणजे रोमन गव्हर्नर पिलाता याच्या हुकुमावरून येशू ख्रिस्ताला गुन्हेगाराप्रमाणे गुड फ्रायडेच्या दिवशीच क्रुसावर चढविण्यात आले. दुपारी तीन वाजता येशू ख्रिस्तांचे प्राणोत्क्रमण झाले. क्रुसावर तीन तास मरणयातना सहन करीत असताना त्यांनी एकूण सात वाक्ये उच्चारली त्यापैकी एक महत्वाचे वाक्य जे आपणां सर्वांनाच माहिती आहे. ते असे की, “हे परमेश्वरा,यांना माफ/क्षमा कर यांना माहिती नाही ते काय करत आहेत.”
प्रभू येशू यांच्या रक्तबंबाळ आणि जखमी डोक्यावर काट्यांचा मुकुट होता आणि हात-पायात खिळे ठोकलेले होते पण तरीही संपूर्ण मानवजातीसाठी,आपल्याला त्रास,यातना आणि दु:ख देणाऱ्या लोकांसाठीही त्यांनी प्रार्थना केली, प्रत्येकाला स्वर्गाचे दार उघडून देणाऱ्या ह्या महामानवाला काय म्हणावं? प्रभू येशू सारखा महामानव कुणी झाला नाही आणि होणारही नाही. खरतर

गुड फ्रायडेचा संदेशच हा आहे की, पापाला जिंकण्यासाठी चांगुलपणा आवश्यक आहे,हिंसेला अहिंसेने तर घृणेला प्रेमानेच जिंकता येतं. आपण प्रभू येशूच्या ह्या शिकवणीचा आदर केला पाहिजे, त्याची शिकवण आचरणात आणली पाहिजे. प्रभू येशू सारखी आपल्या शत्रुसाठीही आपण प्रार्थना केली पाहिजे. कारण प्रार्थना ही नेहमीच ‘स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी’ हाच दृष्टिकोन देत असते. प्रार्थनेत सामर्थ्य असते ते  संस्काराचं, त्यागाचं , सेवेचं, सामूहिक भावनेचं आणि  मांगल्याचंही. आज ताण तणावात, संघर्षात मन अभंग ठेवण्यासाठी, चित्त शुद्धीसाठी प्रार्थनेची खरी गरज आहे. माणसाने अगदी परमेश्‍वरावरही प्रेम करावं. मग परमेश्‍वरही तेवढ्याच उत्कटतेने आपल्यावर प्रेम करतो. मानवाचे आचारविचार, आहारविहारातील नैतिक संकेतच तर त्याच्या जगण्याची उंची वाढवतात. आणि हीच तर सर्वधर्म समभावाची शिकवण आहे.

आज 29 मार्च 2013. वेळ रात्री ९ वाजता.आकाशवाणी अस्मिता वाहिनीवर “ऐसी अक्षरे रसिके” या कार्यक्रमांतर्गत प्रसारित होणार असलेला ललितबंध

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s