“मनभावन” कुसुमाकर मासिकातील एक सदर

kusumakarmasik“मनभावन” 

रोजच्या रोज कितीतरी घटना आपल्या भोवती घडत असतात,आपण त्या बघत असतो पण त्यातली एखादी घटना आपल्याला खूपच आवडते, मनाचा ठाव घेते.ती विशिष्ट घटना,ती गोष्ट पटकन आपली “मनभावन” बनतेआणि आपलं जीवन,आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून जातो……असाच एखादा मन भिजवणारा क्षण, काही आठवणी…

Image

“मनभावन”-एप्रिल १३

“फुल सपोर्ट”

 गौरी कुलकर्णी एक लेखिका कवयित्री,कित्येक वर्षापासुन लिहितेय. अतिशय छान,सुंदर, तरल लिखाण करते,कविता,ललित,ज्ञानदीपच्या निमित्ताने बरचसं निवेदन,वर्तमानपत्रात सदरं,पण ते कधी संकलित केलच नाही…. तिने दिवाळी अंकाच्या निमित्यानेही बऱ्याच मुलाखतीही घेतल्या आहेत. साध्यासुध्या मुलाखती नाहीत तर संगीत क्षेत्रातील एकसे एक नामचीन गायकांच्या,संगीतकाराच्या मुलाखती आणि त्याही स्वत: भेटून,बोलून,आणि त्या प्रत्येकानेही तिला भेटण्यासाठी अगदी २-३ तास दिलेले. अगदी विपुल काम केलयं,करतेय गौरीताई. पण ते कधी पुस्तकाच्या स्वरुपात संकलित करण्याचा तिने फारसा विचारच  केला नाही. गौरीताईच्या नावावर दोन पुस्तकं आहेत. ‘सार तेच….मात्र’ आणि रामकृष्ण परमहंसावर लहान मुलांवर चरित्रात्मक पुस्तक आहे. आणि तिच्या एका कवितेला भारत सरकारच्या वनमंत्रालयाचा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कारही लाभलाय,. २,३ ध्वनिफिती आहेत तिच्या नावावर. त्यातल्या  “शुभंकर गणेशा ” या ध्वनिफितीत तर ८ गाणी तिच्या नावावर आहेत. त्याला स्वर साज चढवलाय तो सुरेश वाडकर,साधना , ज्ञानेश्वर मेश्राम यांनी आणि संगीत दिलयं  ते दस्तुरखुद्द अशोक पत्की यांनी!

भरीस भर म्हणून मराठी विश्व कोशाच्या कन्या कोशाचे गाणं “उतरली नभातून माळ,ती माळ नक्षत्रांची,लखलखीत तेजपुंज, लखलखीत तेजपुंज स्त्री रत्ने महाराष्ट्राची… उतरली नभातून माळ ह्या धरणीवर” तिच्याच लेखणीतून उतरलयं…मग मात्र तिच्या मैत्रिणीनी तिला अगदी फर्मान सोडलं कि आता तुझं पुस्तक यायला हवयं ….बरं ह्या मैत्रिणी तरी कोण? तर जेष्ठ साहित्यिका गिरिजाताई कीर, डॉ.विजया वाड,अनुपमा उजगरे आणि माधवी कुंटे ….मग ऐकायला तर हवंच ना?

अशी सुरु झाली तिची तयारी पुस्तक काढण्याची,पुण्याच्या उन्मेष प्रकाशनाने पुस्तक स्वीकारलं आणि त्याच दरम्यान गौरीताईच्या मिस्टरांचे म्हणजे पी.ल. कुलकर्णी यांचे Electricity Laws, Consumer  Rights & Safety  असे पुस्तक छापून झाले होते आणि त्याचे प्रकाशन व्हायचं होतं . मग त्या दोघांच्या पुस्तकाचं एकत्रच प्रकाशन करायचं ठरलं. सर गौरीताईचे पुस्तक तयार होईपर्यत थांबले आणि मग तो पुस्तक प्रकाशनाचा सुदिन उगवला..शनिवार ९ मार्च २०१३….पु.ल.देशपांडे मिनी थिएटर सकाळी १०:३० वाजता…

गौरी ताईच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ.विजया वाड यांच्या हस्ते होणार होतं तर सरांच्या पुस्तकाचे प्रकाशन विनोद संत जे  National  Safety Council चे Director General  आहेत त्यांच्या हस्ते होणार होतं गौरीताईचे पुस्तक “प्रवास स्वरवंताचा” हे खूपच वाचनीय अगदी अप्रतिम आहे. हेमांगी,सुवासिनी आणि विपुलश्री अशा दर्जेदार दिवाळी अंकासाठी तिने स्वत: भेटून घेतलेल्या मुलाखती,त्यातील भाषाशैली याला तोड नाही वाचक हे पुस्तक वाचून नक्कीच स्वर गंगेत चिंब भिजतील पण सरांचे पुस्तकही तेवढेच महत्वाचे आहे आपल्या आणि आपल्या आप्तजनांच्या सुरक्षेसाठी अगदी आपल्याला छोट्या वाटणाऱ्या पण अतिशय महत्वाच्या गोष्टींचे पालन केलं तर आपलं हे जीवन कस सुखदायक होईल याचा उहापोह या पुस्तकात आहे. जसं इस्त्री,गिझर,लिफ्ट,मिक्सर यांचा वापर कसा करावा, वापर करतांना काय काळजी घ्यावी,काय करू नये याच नेमकं विवेचन या पुस्तकात केलं गेलं आहे…..आणि हे पुस्तकही प्रत्येकाने आपल्या संग्रही बाळगावं असच आहे. हं फक्त त्याचा मराठीत लवकरच अनुवाद व्हावा ही इच्छा! म्हणजे हे पुस्तक सर्वदूर जाईल आणि पुस्तक लिहिण्याचा हेतू साध्य होईल…..असो,

आता तुम्ही म्हणाल यात “मनभावन” काय? तर खरी गोष्ट अजून पुढे यायची आहेच

प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम खूप छान झाला, प्रत्येक वक्ता उभयतांचे आणि त्यांच्या पुस्तकाचे कौतुक करत होता पण त्यावर कळस चढविला तो त्यांचा जावई समीर कुलकर्णी याने …..अगदी दोन मिनिटं ते बोलले असतील पण त्या दोन मिनिटातच त्यांनी पूर्ण सभा जिंकली  त्यांनी सांगितले की,’’माझे सासू सासरे मला आदरणीय तर आहेच पण ते दोघं किती सुंदर जीवन जगतात,ते मला तुम्हां सर्वांना सांगायचं आहे. माझ्या सासऱ्यांचा माझ्या सासूबाईंना फुल सपोर्ट आहे….तर सपोर्ट म्हणजे तुझं तू कर माझं मी करतो असं नाही तर शक्य असेल तेव्हा मी तुझ्याबरोबर असेल आणि तू माझ्या बरोबर असशील.अगदी छोट्या छोट्या गोष्टींची मजा ते दोघे मिळून घेतात, एकमेकांचं छोटसं यशही ते साजरं करतात आणि त्या आनंदात ते आपल्या कुटुंबियांनाही सामील करून घेतातत रिटायर्ड या शब्दालाच त्यांनी आयुष्यातून रिटायर्ड केलयं!  मी माझ्या सासू-सासऱ्याकडून हे शिकलोय. त्यांनी त्यांना खूप शुभेच्छा!’’ अन सगळ्या सभागृहात टाळ्यांचा गजर घुमू लागला. गौरीताईचे जावई जे बोलले ते अगदी मनापासून बोलले होते. अगदी राजहंसासारखं नीरक्षीरविवेक! आणि हाच होता तो माझा ‘मनभावन’ क्षण!

नंतर जेव्हा सरांच्या पुस्तकावर बोलतांना अरुण ठाकूर जे I.O.F.S.चे Joint Director आहेत ते म्हणाले मला वाटत होतं की,मी माझ्या बायकोला तिच्या मनासारखं वागायला सांगून तिला फुल सपोर्ट करतोय….पण नाही,आता मीही यांच्या सारखंच सहजीवन जगण्यास सुरुवात करेन.खरतरं ते इंग्रजीत बोलणार होते पण तो प्रकाशन सोहळा इतका सहज सुंदर कौटुंबिक सोहळा बनला होता त्यामुळे त्यांनीही खूप दिवसांनी जसं जमेल तशा मराठी भाषेत आपलं मनोगत मांडलं आणि हा होता अजून एक ‘मनभावन’ क्षण!’

मला आठवलं की खरचं गौरीताई आणि सर नेहेमी बरोबर असतात,तिच्यासाठी गाडी घेवून येतात तिला इच्छित स्थळी सोडतात,तिला वेळ लागणार असेल तर बराच वेळ गाडीत बसून तिचा इंतजार करतात……आता ती आठवणींची सर एकेक करून उलगडत होती……पती-पत्नीचं सहजीवन असंच तर असतं.नव्हे ते असच असायला हवं हे मला वाटलं आणि सभागृहातल्या प्रत्येकाला वाटलं असणार….त्या उभयतांची खूप पुस्तक येवोत,आणि आयुष्यातील सर्व सुख,समाधान,यश,कीर्ती त्यांना मिळोत हीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना!

———————————————————————————————————————–

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s