‘मनभावन’ ह्या माझ्या कुसुमाकर मासिकाच्या सदरातील दुसरा लेख – ‘नियतीचे दान’

kusumakarmasik

Image                    

‘नियतीचे दान’
काही गोष्टी अगदी अनाकलनीय असतात. बऱ्याचदा  आपण कल्पनाही करत नाही एवढं सुंदर दान नियतीने आपल्या पदरात पाडलेलं असतं.  तेव्हा हा योगायोग बघून,ऐकून मन थक्क होतं. आणि ती आठवण,तो अनुभव, तुमच्या आमच्यासाठी अगदी ‘मनभावन’ होतो. झालं असं, मार्च  २०१२  मध्ये
मी कोकण मराठी साहित्य परिषद,वांद्रे शाखेची अध्यक्ष झाले. त्यावेळी आपल्या वांद्रे शाखेच्या वतीने पहिला कार्यक्रम  आपण  सुप्रसिध्द पत्रकार लेखक श्रीकांत बोजेवार उर्फ तंबी दुराई यांची प्रकट मुलाखत घ्यावी असा एक प्रस्ताव मी आमच्या सदस्यांसमोर मांडला आणि आश्चर्य म्हणजे तो प्रस्ताव लगेचच  संस्थेच्या सदस्यांनी उचलून धरला. मग तो कार्यक्रम बांद्रा येथील National लायब्ररीच्या संयुक्त विद्यमाने करावा असा आम्ही विचार केला कारण त्यांचा स्वत:चा हॉल होता. मग त्यांना तशा आशयाचे पत्र  देताच त्यांनीही तंबी दुराई हे नाव वाचताच त्या  प्रस्तावास लागलीच होकार दिला. त्यावेळी  तंबी दुराईच्या लोकप्रियतेचा, किंवा वाचकांच्या मनावर ‘ दोन फुल एक हाफ ‘ ह्या सदराने कसं राज्य केलंय याचा, सुखद  प्रत्यय मला आला. प्रस्तावातील तंबी दुराई हे नाव वाचताच National लायब्ररीच्या पदाधिकाऱ्यांनी खूप उत्साहाने मला विचारले कि बोजेवार सर कार्यक्रमासाठी येत आहेत तर ते आमच्या National लायब्ररीच्या संगणकीकरणाचे  उद्घाटन करतील का? मग मी बोजेवार सरांना तस रीतसर विचारलं असता  ते  हो म्हणाले. आणि कार्यक्रमाचा दिवस ठरला १४  एप्रिल २०१२.
कार्यक्रमाच्या दिवशी बरेच मान्यवर लोक उपस्थित होते.  पण विशेष म्हणजे बोजेवार सरांचे मित्र,सहकारी दस्तुरखुद्द कविवर्य अशोक नायगावकर हेही मुलाखत ऐकण्यास आले होते.  बोजेवार आणि नायगावकर या दोघांनीही हास्यरंग पुरवणीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं,आणि हास्यरंग पुरवणी मला स्वत:ला प्रचंड आवडत होती. त्यामुळे नायगावकर सर आज बोजेवार सरांची मुलाखत ऐकण्यासाठी उपस्थित आहेत याचा मला खूप आनंद झाला होता.
मुलाखतीचा कार्यक्रम झाल्यावर ह्या जोडगोळीला अशोक जैन सरांकडे जेवायला जायचे होते. अर्थात कारण काहीही असो पण वलयांकित माणसांची आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती असणं हेही  नसे थोडके…… 
बोजेवार सरांची मुलाखत मी आणि गौरी कुलकर्णी  घेणार होतो, सुरवातीचे सत्काराचे सर्व सोपस्कार आटोपल्यावर प्रत्यक्ष मुलाखतीस सुरुवात झाली आम्ही दोघी प्रश्न विचारत होतो आणि बोजेवार सर मनमोकळेपणाने त्याला उत्तर देत होते. अशाच एका प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी सांगितले की, मी जेव्हा मुंबईला आलो तेव्हा बांद्रा येथेच राहत होतो. त्यावेळी माझे संघर्षाचे दिवस होते, खिश्यात काही नसायचं, पण वाचनाचे वेड मला  ह्या National लायब्ररीत घेवून आलं  आणि मी इकडे एकदा येवून नुसतेच पुस्तकांच्या कपाटावर हात फिरवून निघून गेलो होतो.  खरतर हे उत्तर ऐकताच कुणाचही संवेदनशील मन भरून येणारच, तस माझंही मन भरून आलं,पण लागलीच त्यांच्या उत्तरावर प्रतिसाद म्हणून माझ्या तोंडून अवचितपणे हे शब्द निघाले की,” रसिकहो,बघा कशी असते नियती, ज्या National लायब्ररीत येऊन बोजेवार सर फक्त पुस्तकावर हात फिरवून निघून गेले होते ,
आज त्याच National लायब्ररीच्या संगणकीकरणाच्या उद्घाटन करण्याचा सन्मान त्यांना  मिळाला आहे.  एक वर्तुळ पूर्ण झालं , बोजेवार सरांना नियतीने अगदी भरभरून दान दिलं, आणि या मुलाखतीनिमित्त त्या एका अविस्मरणीय घटनेच साक्षीदार होण्याच भाग्य आपल्याला लाभलं ”  माझे वाक्य पूर्ण होताच उपस्थितांच्या टाळ्याच्या कडकडाटाने सभागृह दणाणून गेलं. खरचं अगदी कळत नकळत का होईना पण इतका सुंदर योगायोग,एक सुखद  क्षण अगदी प्रत्येकाला अनुभवयाला मिळाला. त्या मुलाखतीलाही एक वेगळीच उंची लाभली, सर्वांनाच बोजेवार सरांची मुलाखत आवडली. अगदी नायगावकर यांनीही आज श्रीकांत बोजेवार खूप मनमोकळेपणाने बोलले असं आवर्जून आम्हांला सांगितलं.  आणि वांद्रे शाखेचा पहिला कार्यक्रम यशस्वी झाला याचं अतीव समाधान आम्हांला मिळालं .
———————————————-
ज्योती कपिले

ImageIMG_1326 IMG_1358 IMG_1312

Advertisements

2 responses to “‘मनभावन’ ह्या माझ्या कुसुमाकर मासिकाच्या सदरातील दुसरा लेख – ‘नियतीचे दान’

  1. छान उपक्रम. आवडला. अभिनंदन आणि शुभेच्छा!.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s