प्रिय सखी


मी ज्योती कपिले. एक कवयिञी,लेखिका,अनुवादक…
लेखणी माझी प्रिय सखी झाली अन्‌
एक सुरुवात झाली व्यक्त होण्याची,मनातलं हितगुज मनाशी करण्याची,डायरीत लिहिण्याची.
पण आज काळ बदलला आहे  त्यामुळे आज मी व्यक्त होतेय ब्लॉगवर….
मला कधी वाटल नव्ह्तं,
जीवनाच्या एका वळ्णावर,
तू मला अवचित भेटशील,
आणि स्वप्नांना माझ्या नवे रंग देशील,
रंगात त्या रंगूनी, हरखून गेले मी,
चक्क पंखच फूटले मला,
संवादाने तूझ्यारे मना,
मी तर बहरुन गेलेना,
नविनच ओळख मला माझी झाली,
कविता तू माझी “प्रिय सखी” झाली…

2 responses to “प्रिय सखी

यावर आपले मत नोंदवा